CHEMOTHERAPY PART 3

CHEMOTHERAPY PART 3

किमोथेरपीचे साईड इफेक्टस हा कॅन्सरच्या उपचारांमधला सर्वात मोठा अडथळा आहे. ह्या साईड इफेक्टस बद्दल समज कमी व गैरसमजच जास्त आहेत. या सत्रात आपण किमोथेरपीच्या या परिणामांबद्दल बोलू या.

कोणत्याही रसायनाचा एकच एक परिणाम सहसा नसतो एकापेक्षा अधिक परिणाम असतात यातील आपल्याला हवा असलेल्या परिणामाला आपण इफेक्ट म्हणतो व नको असलेल्या परिणामास साईड इफेक्ट अर्थात या दोन्ही गोष्टी रूग्णांच्या लेखी 'त्रास' या सदरात मोडत असल्यामुळे त्यांची सारखीच काळजी घ्यावी लागते.

सर्वप्रथम आपण साईड इफेक्टस म्हणजे सहपरिणाम आणि अॅडव्हर्स इफेक्टस किंवा दुष्परिणाम यातला फरक पाहू या. अॅस्पिरिन सारख्या एखाद्या साध्या गोळीचे उदाहरण घेऊ. अॅस्पिरिन ही गोळी एक वेदनाशामक म्हणून तयार करण्यात आलेली आहे. पण या गोळीमुळे शरीराचे तापमान कमी होते. हा झाला अॅस्पिरिन साईड इफेक्ट. याच अॅस्पिरिन मुळे काही लोकांच्या विशेष करून अतिप्रमाणात मद्यपान करर्णायांमध्ये लिव्हरला सूज येऊन खूप त्रास होण्याची शक्यता असते. हा झाला अॅस्पिरिनचा दुष्परिणाम . किमोथेरपीचेही असेच आहे. ज्या साईड इफेक्टस ह्यउदा. केस गळणे तोंड येणे अशक्तपणा वाटू लागणे ह यांच्या बागुलबुवामुळे किमोथेरपीची लोकांच्या मनात भीती आहे ते परिणाम टाळता येत नाहीत हे काही अंशी खरे आहे. पण सध्या ह्या परिणामांची तीव्रता टाळता येऊ शकणारी इतर औषधे सहज उपलब्ध आहेत. किमोथेरपी घेताना मुख्य काळजी घ्यावी लागते ती दुष्परिणामांची. आधीच्या सत्रात सांगितल्याप्रमाणे किमोथेरपी ही झपाटयाने वाढर्णाया पेशींवर हल्ला करते. सर्वसाधारण किमोथेरपीची औषधे 'नॉर्मल' पेशी व 'कॅन्सरच्या' पेशी यात भेदभाव करत नाहीत. त्यामुळे शरीरातील सर्वच वेगाने वाढर्णाया पेशींवरह्यउदा. केसांची मुळे. तोंड व आतड्यांवरील आवरण पांढया पेशीह किमोथेरपीचा परिणाम होतो.

किमोथेरपी देताना अगदी सुरूवातीचा त्रास म्हणजे उलटया होणे. हा त्रास कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी किमोथेरपीआधी औषथे दिली जातात त्यामुळे शेकडा 5 ते 10 टक्के रूग्णांवर उलटयांचा खूप त्रास होऊन अन्न कमी जाणे किंवा पुनपुन्हा सलाईन लावावे लागण्याची पाळी येते सर्वांवर नाही. या उलटया 3 ते 4 दिवसांत थांबतात व रूग्ण नेहमीसारखे जेवण घेऊ शकतात. उलटया टाळण्यासाठी वरचेवर पाणी दिस् घेणे सौम्य आहार घेणे थोडे थोडे अन्न वारंवार घेणे यासारखे उपाय करता येतात.

किमोथेरपी दिल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी होण्यास सुरूवात होते. हा किमोथेरपीचा सर्वात महत्वाचा आणि गंभीर परंतु दुर्दैवाने सर्वात दुर्लक्षलेला परिणाम आहे. पेशींचे प्रमाण कमी व अंगात ताप असणे ह्याला पएरलिए एतरेपनी असे म्हणतात. पांढया पेशी या आपल्या शरीरातील संरक्षक पेशी असतात. यांची संख्या 400 मिली पेक्षा कमी झाल्यास इन्फेक्शनचा धोका असतो व पेशींचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीराची अंतर्गत यंत्रणा हे इन्फेक्शन आटोक्यात ठेवण्यात असमर्थ असते या अवस्थेत रूग्णास तातडीने रूग्णालयात दाखल करून घेऊन त्याला त्वरित प्रतिजैविके ह्यअन्तर्बितिच्स्हि घेणे अत्यावश्यक असते. उशीर झाल्यास हेच इन्फेक्शन शरीरात सर्वत्र पसरून जीवघेणे ठरू शकते. इन्फेक्शन टाळण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छता रूग्णाच्या आजूबाजूचा परिसर त्याचे अन्नपाणी व त्याच्या संपर्कात येर्णाया इतर व्यक्ति यांची स्वच्छता महत्वाची ठरते. किमोथेरपी देण्याआधी रूग्ण अशक्त असल्यास किंवा त्याला पूर्वी पासूनचे इन्फेक्शन असल्यास हा त्रास होण्याचा धोका वाढतो. किमोथेरपीचा डोस जास्त झाल्यासही हा त्रास होऊ शकतो. या दुष्परिणामाला टाळणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. किमोथेरपीनंतर पेशींची संख्या वाढवणारी इंजेक्शन्स आता उपलब्ध आहेत या इंजेक्शन्सचा डोस किमोथेरपीनंतर दुर्सया किंवा तिर्सया दिवशीपासून घेतल्यास 8व्या दिवशी पेशींचे प्रमाण खूप कमी होत नाही व इन्फेक्शनचा धोका टळू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे किमोथेरपीनंतर आलेल्या तापाकडे दुर्लक्ष करू नये अथवा डॉक्टरांना न दाखवता स्वतः उपचार करू नयेत.

किमोथेरपीनंतर साधारणतः 17 18 दिवसांनी केस गळायला सुरूवात होते. केस गळताना कोणत्याही वेदना होत नसल्या किंवा त्यामुळे जिवाला कसलाही धोका नसला तरी हा साईड इफेक्ट रूग्णाच्या मानसिकतेवर परिणाम करणारा आहे. सर्वच प्रकारच्या किमोथेरपीमुळे केस गळतात असे नाही. दुसरे म्हणजे किमोथेरपीच्या सायकल्स संपल्यानंतर केस पुन्हा येतात व काही महिन्यातच चारचौघात वावरण्याइतपत केस आलेले असतात.

किमोथेरपी घेतानाचे हे त्रास तात्पुरत्या स्वरूपाचेच असतात यातील कोणताही परिणाम जास्त दिवस टिकत नाही. पण काही औषधांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. हृदयावर अति ताण येणे शुकजंतुंची संख्या कमी होणे हातापायांच्या नसांवर दुष्परिणाम व काही रक्तरोग हे त्रास उदभवू शकतात.

कॅन्सरच्या प्रकाराप्रमाणे त्यासाठी सुरू असलेल्या किमोथेरपीप्रमाणे व रूग्णाच्या एकंदर स्थितीप्रमाणे ह्या त्रासांचे किंवा साईड इफेक्टसचे स्वरूप व तीव्रता यात बदल होऊ शकतो त्यामुळे झालेल्या कोणत्याही त्रासासाठी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करूनच उपचार सुरू करावेत

किमोथेरपीच्या सर्व औषधांचे हे परिणाम होतातच असे नाही किंबहुना बहुतेक रूग्णांना यातील गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. किमोथेरपी घेताना या सर्व परिणामांची माहिती असल्यास व योग्य ती खबरदारी बाळगल्यास किमोथेरपी कोणतीही अडचण न येता पार पडू शकते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला असल्यास किमोथेरपीची अनाठायी भीती बाळगण्याची गरज नाही.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »