किमोथेरपीच्या साईड इफेक्टस बरोबरच किमोथेरपी घेतानाची पथ्ये व काळजी या महत्वाच्या गोष्टी आहेत. साईड इफेक्टसप्रमाणेच ह्याबाबतीतही अनेक गैरसमज आहेत.
किमोथेरपी घेण्याआधी आपल्याला कोणता आजार आहे. त्याची स्टेज कोणती व उपचारामध्ये किमोथेरपीचा कसा उपयोग होणार आहे याची संपूर्ण माहिती घेणे जरूरीचे आहे किमोथेरपी घेण्याआधी किडनी लिव्हर व रक्तपेशींचे प्रमाण योग्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागते. या तपासण्या प्रत्येक किमोथेरपी सायकल पूर्वी करून घेणे आवश्यक असते. किमोथेरपीची औषधे आणताना त्यावरील तारखा व ही औषधे कोणत्या तापमानात ठेवावी लागणार आहेत हे पाहणे गरजेचे आहे. सरसकट सर्व औषधे फीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. जी औषधे फ्रीजमध्ये ठेवावी लागतात ती दुकानातून विकत घेताना आईसपॅक बरोबरच घ्यावीत म्हणजे त्यांचे योग्य ते तापमान राखले जाते.
किमोथेरपी हे एक महत्वाचे औषध आहे. आपल्याच शरीराच्या एका भागाला नष्ट करण्यासाठी दिलेले ते एकाप्रकारचे विषच आहे. त्यामुळे किमोथेरपीला कमी लेखण्याची किंवा 'लाईटली' घेण्याची चूक करू नये. किमोथेरपी घ्यावी की नाही घ्यायची असल्यास कोणत्या प्रकारची व किती प्रमाणात ह्या गोष्टी योग्य त्या तज्ञांकडूनच समजावून घ्यावीत किमोथेरपी घेताना फक्त सोईची जागा जवळचा दवाखाना याचा विचार न करता सर्व सोईंनी युक्त अश्या हॉस्पिटलमध्येच घ्यावी. कोणत्याही प्रकारची घाई गडबड करण्यात अर्थ नसतो किमोथेरपी ही योग्य त्या तज्ञांच्या ह्यदचि स्तिह्न च्या देखरेखीखालीच घेणे आवश्यक आहे इतर तज्ञांकडून घेताना सर्व ती शास्त्रॆपर्थ्येडोस पाळले जातातच असे नाही.
किमोथेरपी देताना हाताला सुई लावून त्यातून सलाईन सुरू केले जाते. ही सुई व्यवस्थित लागली आहे ह्याची खात्री केल्याशिवाय किमोथेरपी सुरू केली जात नाही. सुई लावलेल्या ठिकाणी सूज असल्यास किंवा तिथे पुरळ उठल्यास डॉक्टरांना कळवावे त्याठिकाणी सलाईन विनासायास जाते आहे याची खातरजमा केल्यावरच किमोथेरपीची इंजेक्शन्स त्यात मिसळली जातात.
खरं पाहिल्यास किमोथेरपी दरम्यान खाण्यापिण्याची कोणतीही खास अशी पथ्ये नसतात हे एक शास्त्रीय सत्य आहे. बहुतेक पथ्ये ही गैरसमज व अज्ञान यांवर आधारलेली असतात पण खाण्यापिण्याचे पथ्य सांगत नाही तो डॉक्टर कसला असे बयाच रूग्णांचे मत असते. रूग्णास ब्लडप्रेशर डायबेटीस हृदयरोग यासारखे आजार असल्यास त्यांची योग्य ती पथ्ये पाळावीच लागतात. कच्चे अन्नह्यफळे सलाडसहखाऊ नये असा एक गैरसमज आहे. फळे जर स्वच्छ धुऊन व साली काढून घेतल्यास त्यापासून कोणताही धोका नाही. किंबहुना या फळांमधून आवश्यक ती व्हिटॅमिन्स कॅलरीज व चोथा ह्यपरिएह मिळते. किमोथेरपीच्या साईड इफेक्टस मुळे अनेक रूग्णांना शिजवलेले अन्न किंवा स्वयंपाकाच्या फोडणीचा वास सहन होत नाही त्यामुळे मळमळीची भावना वाढीला लागते. या परिस्थितीत फळे दूध आई स्कीम मिल्कशेक व ज्यूस यांच्यामुळे रूग्णाच्या आहाराची समस्या राहात नाही.
किमाथेरपीच्या दिवशी सकाळी सौम्य नाश्ता घ्यावा किमोथेरपी घेण्यासाठी उपाशीपोटी राहण्याची अजिबात गरज नसते. किमोथेरपी सुरू असताना सलाईन दिले जाते. उलटीची भावना होत नसल्यास किमोथेरपी सुरू असताना जेवण घ्यायला हरकत नसते. जेवण एकाच वेळी भरपेट करू नये अर्धपोटी थांबायला हरकत नाही. पण वरचेवर थोडाथोडा
आहार जरूर घ्यावा. जेवणातील पदार्थ अति तेलकट तिखट किंवा मसालेदार नसावेत. मांसाहार किंवा नॉनव्हेज आवडत असल्यास घ्यायला हरकत नाही पण मांसाहारी पदार्थ नीट शिजवलेले असावेत व अतिमसालेदार नसावेत. जेवणाबरोबर पाणी सूप ताक यासारखे पातळ पदार्थ पुरेश्या प्रमाणात घेतल्यास जेवण पचायला मदत होते उलटया थांबवण्यासाठी देण्यात येर्णाया औषधांमुळे बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो हा त्रास कमी होण्यासाठी या पातळ आहाराचा निश्चितच उपयोग होतो.
किमोथेरपी सुरू असताना विश्रांती घेणे गरजेचे असते हे जरी खरे असले तरी अगदी अंथरूणावर पडून राहावे लागत नाही. नेहमीची सवय असल्यास हलका व्यायाम करायला हरकत नाही पण शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. सकाळी फिरायला जाणे घरातील छोटी मोठी कामे करणे यामुळे अन्नपचनाला मदत होते व भूकही चांगली लागते. घरातील किंवा येर्णाया पाहुणे मंडळींना काही इन्फेक्शन्स असल्यास त्यांना काही अंतरावरच ठेवणे जरूरीचे आहे.
किमोथेरपी सुरू असताना ब्लडप्रेशर डायबेटीस यासारख्या आजारांची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू ठेवावीत. साईड इफेक्टस कमी करण्यासाठी आयुर्वेदिक किंवा होमियोपॅथीची औषधे घेण्याची अनेक रूग्णांची इच्छा असते. पण ही औषधे आणि किमोथेरपी यांचा एकत्र परिणाम काय होऊ शकेल याची कोणालाही नीटशी माहिती नसते त्यामुळे ही औषधे कॅन्सरतज्ञांच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय घेऊ नयेत.
इतर कोणत्याही औषधपद्वती प्रमाणेच किमोथेरपी ही देखील एक प्रगत उपचारपद्वती आहे. इतर उपचारपद्धतींप्रमाणेच याचे फायदे व तोटे आहेत. कॅन्सरतज्ञांकडून पुरेशी माहिती घेऊन गैरसमज टाळल्यास व योग्य काळजी व शास्त्रशुद्ध उपचार घेतल्यास अपेक्षित परिणाम व कमीत कमी साईड इफेक्टस असे नक्कीच साधता येईल.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh