कॅन्सर किमोथेरपी
किमोथेरपी या शब्दाची 'कॅन्सर' इतकीच दहशत आहे. वेळप्रसंगी मोठमोठी ऑपरेशन्स करून घेताना न डगमगणारे लोक किमोथेरपी घ्यायच्या वेळी मात्र हात पाय गाळतात. किमोथेरपी टाळता येते का याची चाचपणी केली जाते. अनेक 'सेकंड ओपिनियन' घेतले जातात. खर्च. अशक्तपणा. भीती यापासून थेट 'घरातलं लग्न' अशा सबबी सांगून होतात
आणि मग नाईलाजस्तव किमोथेरपी सुरू होते. मनात प्रश्न असतोच " हे काय आहे. कशासाठी आहे...”
किमोथेरपी म्हणजे नक्की काय याबद्दल थोडे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
किमोथेरपी या शब्दाची फोड 'किमो ' म्हणजे रसायन व ' थेरपी ' म्हणजे उपचार अशी आहे. विविध प्रकारची रसायने ह्यऔषधेह्र वापरून कॅन्सरवर केलेले उपचार म्हणजे किमोथेरपी होय. ही रसायने झटपट विभाजन होयया व झटपट वाढर्णाया पेशींवर मारा करून त्यांना नष्ट करतात. कॅन्सरच्या पेशी तसेच शरीरातील काही 'नॉर्मल' पेशी देखील झटपट वाढर्णाया असतात. यामुळे पांढया पेशी केस अन्नमार्गाच्या आतील आवरण यांवरही ह्या रसायनांचा परिणाम होतो. त्यामुळे किमोथेरपी दरम्यान केस गळणे. तोंड येणे जुलाब होणे अशक्तपणा वाटणे पांढया पेशींचे प्रमाण कमी होऊन इन्फेक्शन्स होणे हे त्रास होऊ शकतात ह्यालाच आपण साईड इफेक्टस म्हणता ह्या किमोथेरपीचे इतके त्रास हो असताना ती का घ्यायला लावतात हे आधी समजून घेणे आवश्यक आहे.
कॅन्सरची अगदी सुरूवात होते त्या वेळी एका पेशीच्या दोन दोनाच्या चार अशी त्यांची वाढ होत जाते . जसजशी पेशींची संख्या वाढत जाते तश्या काही पेशी शरीरात इतरत्र मोकाट फिरू लागतात. कारण कॅन्सरच्या पेशी एका जागी चिकटून राहात नाहीत. कॅन्सरच्या १ से .मी व्यासाच्या गाठीत ज्याला आपण खूप आधीची स्टेज म्हणतो त्यात सुद्धा काही लाख पेशी असतात. यातल्या किती पेशी मूळ जागा सोडून शरीरात पसरलेल्या असतील याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. या पेशी कोणत्याही तपासणीद्वारे शोधून काढता येत नाहीत पण त्यांचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे. यामुळे कॅन्सरची गाठ ऑपरेशन करून समूळ नष्ट जरी केलेली असली तरी या पसरलेल्या पेशींमुळे कॅन्सर पुन्हा उदभवण्याची भीती कायम राहते. मूळ गाठ काढल्यानंतर तर या पेशी अधिकच वेगाने वाढू शकतात. या पेशींवर मारा करण्यासाठीच किमोथेरपी दिली जाते'
कॅन्सर या रोगावर खरे संशोधन झाले ते गेल्या पन्नास वर्षातच . कॅन्सरवैद्यकशास्त्र यैन्टेलेग्य्ह ह्या नव्या शास्त्राचा उदय गेल्या ३० ते ३५ वर्षात झाला. जसा हृदयासाठी ‘हार्ट स्पेशलिस्ट' मूत्रविकारांसाठी 'युरॉलॉजिस्ट ' तसा कॅन्सरसाठी 'कॅन्सर स्पेशलिस्ट' किंवा कॅन्सरतज्ञ ही संकल्पनाही गेल्या काही वर्षांमधलीच कॅन्सरची शस्त्रकिया पएरातन्हि करणारा 'सर्जिकल ऑकॉलॉजिस्ट' किमोथेरपी देणारा 'मेडिकल ऑकॉलॉजिस्ट' व किरणोपचार रेडिएशन थेरपी देणारा ' रेडिएशन ऑकॉलॉजिस्ट' हे या क्षेत्रातील विविध प्रकारचे तज्ञ आहेत
हे किमोथेरपी म्हणजे आजकालचं 'खूळ' आहे झालं. पूर्वी कुठे होती किमोथेरपी' हे वाक्य र्बयाच वेळा ऐकायला मिळते हे 'नवं खूळ' पुष्कळ जुने आहे. पॉल अर्लीश या शास्त्रज्ञाने किमोथेरपीचा शोध १९व्या शतकाच्या सुरूवातीला लावला. त्यानंतर लिसॉयर नावाच्या शास्त्रज्ञाने ' अर्सेनिक' या धातूचा रक्ताच्या कॅन्सरह्यच्हरेनच् म्य्एलेदि एक एमीह मधील वापराबद्दलचा शोधनिबंध १८९० साली ' लॅन्सेट' या शास्त्रीय मासिकात प्रकाशित केला होता किमोथेरपीबद्दलचा हा पहिला शास्त्रीय संदर्भ आहे. अनेक वर्षांनी दुर्सया महायुध्दाच्या वेळी इटली येथील बारी नावाच्या बंदराजवळ जैवरासायनिक लष्करी सामुग्री वाहून नेर्णाया एका जहाजाचा स्फोट झाला. या बंदरावरील खलाशी व त्या भागातील इतर लोकांच्या रक्तातील पांढया पेशी व प्रतिकारशक्ती लक्षणीयरित्या कमी झाल्या होत्या. या जैवरासायनिक अस्त्रावर संशोधन करून 'नायट्रोजन मस्टर्ड ' हे औषधीतत्व मिळवण्यात यश आले आणि आधुनिक किमोथेरपीचा जन्म झाला. 'नायट्रोजन मस्टर्ड' जवळजवळ १९८० पर्यंत ‘लिम्फोमा' या लसिकाग्रंथींच्या कॅन्सरसाठी वापरात होते.
दुर्सया महायुध्दानंतर झालेल्या प्रगतिमध्ये पेशींची जडणघडण.त्यांची कार्ये व महत्त्व या मूलभूत गोष्टींमध्ये संशोधन झाले व नवी चालना मिळाली. डॉ. बर्नार्ड फिशर यांनी १९५६ साली स्तनाचा कॅन्सर झालेल्या स्त्रियांना शस्त्रकियेनंतर किमोथेरपी दिल्याने त्यांच्या आयुष्यमानात लक्षणीय वाढ असल्याचे एका शोधप्रकल्पाद्वारे दाखवून दिले. अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे झालेल्या प्रयोगामुळे २ महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही अवयवांच्या कॅन्सरसाठी फक्त शस्त्रकिया करणे पुरेसे नाही तर किमोथेरपीही आवश्यक आहे हे सिदध झाले आणि दुसरे म्हणजे वैद्यकीय शोधप्रकल्पांच्या ह्यर्निचर तराल्हि एका नव्या पर्वाला सुरूवात झाली.
जैवशास्त्रात झालेल्या प्रगतिबरोबर किमोथेरपीची औषधे ती देण्याच्या पद्वती होणारे फायदे. त्यातील त्रास यात आमूलाग्र बदल झाला आहे. किमोथेरपी म्हणजे अतिशय वेदनादायी अशी अनेक इंजेक्शन्स हे समीकरण आता जवळजवळ पूर्णपणे बदलेले आहे. पूर्वी किमोथेरपीची इंजेक्शने ही शिरेतून 'डायरेक्ट' दिली जात असत ज्यामुळे ती देताना खूप वेदना होत. सध्याची औषधे ही सलाईनमध्ये मिसळून दिली जात असल्याने सलाईनची सुई लावताना होतात तेवढयाच काय त्या वेदना होतात. त्यानंतर सर्वसाधारण सलाई नप्रमाणे किमोथेरपी चालू राहते.
पेशींच्या रचनेबद्दल जशी अधिक माहिती मिळत जात आहे त्याबरोबर किमोथेरपी ही अधिक खोलात शिरून कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करण्यात यशस्वी होऊ लागली आहे. याच किमोथेरपीला 'टार्गेटेड थेरपी' असे म्हणतात जी आता सर्रास उपलब्ध आहे. ह्या किमोथेरपीचे वैशिष्टय म्हणजे याचे साईड इफेक्टस अतिशय कमी आहेत व फक्त कॅन्सरग्रस्त अवयवच नव्हे तर प्रत्यक्ष पेशींमध्ये शिरून त्यातील दोष हेरून त्यावर मात करणारी ही थेरपी आहे. या 'टार्गेटेड थेरपी' मध्ये काही गोळयांचादेखील समावेश आहे. त्यामुळे किमोथेरपी आता तोंडी घेण्याच्या गोळर्याकॅप्सूल्सच्या स्वरूपातही दिली जाते. . आज अनेक पेशंट किमोथेरपीचे उपचार घेऊन इतर लोकांप्रमाणेच 'नॉर्मल' आयुष्य जगत आहेत.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh