CHEMOTHERAPY PART 2

CHEMOTHERAPY PART 2

मागील भागात आपण किमोथेरपीबद्दलची माहिती ऐकली. ह्या उपचारपद्धतीचा वापर नक्की कोणत्या रूग्णांसाठी केला जातो ते पाहू,
किमोथेरपी ऑपरेशनच्या आधी नंतर किंवा ऑपरेशनऐवजी देता येते तर काही रूग्णांना रेडिएशनबरोबर किमोथेरपी दिली जाते. या प्रत्येक परिस्थितींमध्ये किमोथेरपी देण्याची कारणे वेगवेगळी आहेत.

काही रुग्णांमध्ये कॅन्सरची गाठ खुप वाढलेली असते. या रुग्णांवर शस्त्रकिया करणे धोक्याचे असते कारण त्यात रक्तस्त्राव खूप जास्त होऊ शकतो तसेच आजूबाजूचा 'नॉर्मल' भाग जास्त प्रमाणात काढावा लागण्याची शक्यता असते. ह्या त्रासदायक शस्त्रकियांना पर्याय म्हणून किमोथेरपी दिली जाते. या किमोथेरपीला रूग्णाने प्रतिसाद दिल्यास गाठ लहान होत जाते आणि कधीकधी नाहीशी देखील होते. गाठ लहान झाल्यास त्यासाठीची

शस्त्रकिया निश्चितच सोपी होते व त्यात होणारा रक्तस्त्रावही कमी होतो. या किमोथेरपीचा दुसरा फायदा म्हणजे काही अवयव पूर्णपणे काढायची शस्त्रकिया करायची गरज राहात नाही. उदा. स्तनातील गाठ जर मोठी असेल तर स्तन संपूर्णपणे काढावा लागतो. याच स्थितीमध्ये किमोथेरपी देऊन गाठ लहान केल्यास स्तन वाचवण्याची शस्त्रकिया करता येते. स्वरयंत्र हाडाचा कॅन्सर यामध्ये किमोथेरपी देऊन गाठ लहान करण्याला खूपच महत्त्व आहे हे अवयव वाचवता आल्यास कॅन्सर बरा होण्याबरोबरच रूग्णाच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते.
ऑपरेशन झाल्यानंतर किमोथेरपीची गरजच काय असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. ऑपरेशननंतर शरीर व खिसा नुकताच सावरतो असे वाटत असताना किमोथेरपीच्या ६ सायकल्स घेणे नकोसे वाटते. पण काही कॅन्सरमध्ये ही किमोथेरपी घेणे अत्यावश्यक असते ऑपरेशननंतर ३ ते ४ आठवडयातच किमोथेरपी घेतल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा होऊ शकतो त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास त्याचा फायदा कमी पण साईड इफेक्ट मात्र तेवढेच होतात. या किमोथेरपीमुळे शरीरात इतरत्र पसरलेल्या पेशींवर नियंत्रण ठेऊन त्यांना पूर्णपणे संपवण्यास मदत करते. ही किमोथेरपी घेताना उशीर केल्यास किंवा डोस कमी दिला गेल्यास कॅन्सर पुन्हा उदभवण्याची भिती असते. स्तनांचा कॅन्सर, बीजकोषांचा कॅन्सर मोठ्या आतड्यांचा कॅन्सर यात ह्या ऑपरेशननंतर दिल्या जार्णाया किमोथेरपीमुळे आयुष्यमानात चांगलीच वाढ होते व कॅन्सर पूर्णपणे बरा होण्यास मदत होते.
काही रूग्णांमध्ये मात्र कॅन्सर सर्वत्र पसरलेल्या असल्यास ऑपरेशन करणे शक्य नसते. या रूग्णांसाठी किमोथेरपी हा एकमात्र उपाय आहे. ह्या उपचारातून रूग्ण पूर्ण बरा होण्यासारखी स्थिती नसते पण किमोथेरपीमुळे आजाराचा त्रास कमी होऊ शकतो व रूग्णाच्या शरीराने चांगला प्रतिसाद दिल्यास आयुष्य वाढू शकते. ही किमोथेरपी देताना रूग्णाला कमीत कमी त्रास होईल याची खबरदारी घेतली जाते. ह्या किमोथेरपीच्या ४ ते ६ सायकल्स दिल्यानंतर आजाराची स्थिती जर स्थिर असेल तर उपचार थांबवले जातात.
गर्भाशयमुखाच्या किंवा तोंडाच्या कॅन्सर मध्ये आजर दूरवर पसरण्याची शक्यता कमी असते पण हे आजार जागच्या जागी अतिशय आक्रमक असतात. यासाठी त्याच जागेवर रेडिएशनचा मारा करून ह्या आजाराच्या गाठी नष्ट केल्या जातात. हे रेडिएशन जास्त परिणामकारक ठरावे यासाठी काही किमोथेरपीची इंजेक्शन्स दर आठवडयाला दिली जातात. या किमोथेरपीमुळे विशेष त्रास होत नाही मात्र रेडिएशनचा होत असलेला त्रास वाढू शकतो.
कोणत्या आजारासाठी कोणती औषधे किती प्रमाणात द्यावी हे किमोथेरपीचे तज्ञचह्यंएदचिल् "न्टैस्तिह सांगू शकतात त्यांच्या सल्ल्याशिवाय किमोथेरपी घेणे धोक्याचे ठरू शकते.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »