Challenge Study – Marathi Baraha


Challenge Study – Marathi Baraha

कॅन्सरचे उपचार पूर्ण झाले, आता काय?

हा प्रश्न बहुतेक रुग्णांना पडतो. एका मोठ्या आजाराच्या त्रासातून आपली सुटका झाल्याची भावना असतेच,  पण कॅन्सर पुन्हा उद्भवण्याची भीतीही असते. उपचार  ‘संपताना डॉक्टरांकडून 'चांगली निरोगी जीवनशैली ठेवा, आहारावर नियंत्रण ठेवा, व्यसनाांपासून दूर राहा’ असा ढोबळ सल्ला सगळयांना  मिळतो पण  तेवढ्याने रुग्णाचे  समाधान होत नाही. ‘अजून काही गोळ्या किंवा इंजेक्शन्स आहेत का’ अशी उपचारांची चाचपणी होते. काही जण आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा इतर पूरक उपचारपद्धतींबद्दल माहिती घेतात.‘अमुक एक उपचार घ्या, कॅन्सर परत होणार  नाही’ अशी खात्रीकोणीच देऊ शकत नसल्याने ज्याला जो उपचार पटतो, तो उपचार घेत राहतो. काही लोक ‘आताच आजारातून उठलोय, आता कोणतेही उपचार नकोत’ अशा मताचे असतात. काही लोक खाण्या-पिण्याची पथ्य कसोशीने पाळतात तर काही रोगमुक्त झाल्याच्या आनांदातून खाण्या-पिण्याची कसलीच पथ्य पाळत नाहीत. या सगळ्यमधला  योग्य मार्ग कोणता याचे नेमक उत्तर ठाऊक नाही.  

जुलै २०२५ मधे वैद्यकशास्त्रातल्या प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या नियतकालिकात एक कोलन हेल्थ ॲण्ड लाईफलॉन्ग एक्सरसाईझ चेन्ज (संक्षिप्त नाव- चॅलेंज) नावाचा शोध  प्रकल्प प्रकाशित झाला. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या २ प्रमुख देशाांमध्ये हा शोध प्रकल्प सन २००९ ते २०२४ या काळात ५५ वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये राबवला गेला. मोठ्या आतड्याच्या (कोलन) कॅन्सरवरील कॅन्सरचे आवश्यक ते सर्व उपचार केल्यानांतर कॅन्सर पुन्हा उद्भवू नये यासाठी एक अभिनव उपाययोजना केली गेली. ही उपाययोजना आधी काही रुग्णांवर वापरून त्यातला शास्त्रीय विचार ,सुरक्षितता आणि परिणामकारकता यांची खात्री करण्यात आली होती.

काय होते हे संशोधन ? 

मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचे उपचार (शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी) यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या जवळपास ९०० रुग्णांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. एका गटाला आरोग्य, आहार आणि व्यायामविषयक माहितीपत्रके देण्यात आली आणि त्यानुसार जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देण्यात आला.

या रुग्णांची काही ठळक वैद्यकीय वैशिष्ट्ये पाहूया:

- सरासरी वय ६१ वर्षे होते. सुमारे एक-तृतीयांश रुग्ण ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते.

- जवळपास ४०% रुग्ण वजनाच्या निकषांनुसार ‘लठ्ठ’ (Obese) गटात मोडणारे होते.

- सुमारे ६०% रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. म्हणजेच त्यांना आतड्याच्या कॅन्सरसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग यांसारखे इतर आजारही होते.

- सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे सुमारे ९०% रुग्ण तिसऱ्या टप्प्यातील (Stage III) कॅन्सरग्रस्त होते.

तब्बल १५ वर्ष  चाललेल्या या प्रकल्पाचा निष्कर्ष विचार करायला लावणारा आहे. देखरेखीखाली व्यायाम करणाऱ्या  गटात कॅन्सर पुन्हा होण्याचे किंवा  मृत्युचे प्रमाण  २८%  कमी झालेले आढळले.

या शोधप्रकल्पाची आणखी काही वैशिष्टये आहेत.    

१. हा प्रकल्प कोणत्याही  औषध कंपनीने प्रायोजित केलेला नव्हता. व कोणाचे व्यवसायिक लागेबाांधे नाहीत.  

२. प्रकल्पाचा साांख्यिक आणि तर्कशास्त्राचा  पाया भक्कम आहे त्यामुळे दीर्घकाळ  चाललेला प्रकल्प असूनही रुग्णामधल्या  सुधारणेचा फरक लक्षणीय आहे.  

३. कॅन्सर पुन्हा होण्याच्या किंवा मृत्युच्या दरात झालेली २८% घट कोणत्याही औषधाशिवाय  झालेली आहे (प्रगत ‘टागेटेड थेरपी, इम्युनोथेरपी किंवा तत्सम महागड्या  उपचाराांनीही इतकी सुधारणा  सहज साध्य होत नाही). 

४. देखरेखीखाली व्यायाम हा सर्वात महत्वाचा घटक आहे. योग्य प्रमाणात , योग्य पद्धतीन व्यायाम होणे गरजेचे आहे. कॅन्सरचे उपचार झाल्यानांतर स्वस्थ न बसता पद्धतशीर व्यायाम केल्याने कॅन्सरचा पुनरुद्भव टाळायला मदत होते हा विचार ह्या शोधप्रकल्पाद्वारे रुजवला गेला.   



- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh
Prev Explore